मागील काही महिन्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता.सत्ताधारी आणि विरोधक एक ही मुद्दा आरोप प्रत्यारोप करण्याची संधी सोडताना दिसत नाही. मात्र आज पुण्यातील PMPLच्या चार ठेकेदारांनी अचानक संप पुकारल्याने त्याचा नाहक फटका सर्व सामान्य नागरिक आणि विद्यार्थीवर्गाला अधिक बसला आहे. त्याच दरम्यान कसबा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार रविंद्र धंगेकर आणि भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे सर्व PMPLबस सुरू करण्याच्या मागणीसाठी एकत्रित आल्याचे पाहायला मिळाले.